मुंबई : मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर स्फोटके शोधण्यास मदत करणारा पोलिसांच्या श्वान पथकातील 'टायगर' या कुत्र्याचा शनिवारी मृत्यु झालाय.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या चार महिन्यात मुंबईकरांच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांच्या श्वान पथकातील तीन कुत्र्यांचा झालाय.
26/11 hero Tiger laid to rest in farmhouse he was living in post-retirement. His buddy Caeser attended the funeral pic.twitter.com/LKX4MXRV3s
— ANI (@ANI_news) July 23, 2016
फुफ्फुसाच्या आजाराने ग्रासलेल्या 'टायगर'वर मे २०१५ पासून विरार येथील 'फिझा फार्म' इथं उपचार सुरु होते.
मात्र, शुक्रवारी त्याची प्रकृती अधिकच खालावली आणि शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती 'फिझा फार्म'चे मालक फिझा शहा यांनी दिलीय.