महागाईविरोधात सर्वपक्षीय आंदोलन, थाळी-लाटणे मोर्चाचे आयोजन

वाढत्या महागाईला आळा घालण्यात राज्य तसेच केंद्र सरकारला मोठे अपयश आलेय. या महागाई विरोधात आज सर्वपक्षीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. 

Updated: Oct 20, 2015, 12:59 PM IST
महागाईविरोधात सर्वपक्षीय आंदोलन, थाळी-लाटणे मोर्चाचे आयोजन

मुंबई : वाढत्या महागाईला आळा घालण्यात राज्य तसेच केंद्र सरकारला मोठे अपयश आलेय. या महागाई विरोधात आज सर्वपक्षीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. 

मुंबई काँग्रेस आणि मुंबई महिला काँग्रेसच्यावतीने डाळी, कडधान्ये आणि भाज्यांच्या वाढत्या किंमतींविरोधात थाळी-लाटणे मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. वांद्रे पूर्व खेरवाडी सिग्नलपासून सुरु होणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असेल. तर राज्यात सत्ताधारी पक्षासोबत असणारी शिवसेनाही डाळींच्या वाढत्या दरावरुन भाजपला टार्गेट करणार आहे. 

सांताक्रुज रिलायन्स मॉल बाहेर शिवसेनेकडून स्वस्त तूरडाळ विकण्यात येणार आहे. तर मनसेही महागाईच्या आंदोलनात सहभागी होणार आहे. बोरिवली विभागात मोर्चा काढून वाढत्या महागाईबद्दल मनसे भाजप सरकाचा निषेध करणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.