मुंबई : महापौर निवासस्थानाची जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला देण्याचा शेवटच्या दिवशी प्रस्ताव सुधार समितीनं मंजूर केलाय.
परंतु, आज लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळं पालिका सभागृहात मात्र हा प्रस्ताव मंजूर करता येणार नाही. त्यामुळे, नव्या येणाऱ्या पालिका सभागृहात आता हा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा लागणार आहे.
यावर, भाजपने शेवटच्या दिवशी प्रस्ताव सुधार समितीत आणून शिवसनेचा 'गेम' केल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटतेय. सेना पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा न केल्यानं सभागृहात प्रस्ताव उशिरा आल्याचं म्हटलं जातंय.