वांद्रे निवडणूक : राणे जिंकले तर... हरले तर...

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरणार आहे. आधीच निराशाच्या गर्तेत असलेल्या काँग्रेसच्या राज्यातील भविष्याच्या वाटचालीवर हा निकाल परिणाम ठरणार आहे. तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निकाल शिवसेनेसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे नारायणे राणेंचे राजकीय भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून असणार आहे.

Updated: Apr 14, 2015, 06:48 PM IST
वांद्रे निवडणूक : राणे जिंकले तर... हरले तर... title=

दीपक भातुसे, मुंबई : वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरणार आहे. आधीच निराशाच्या गर्तेत असलेल्या काँग्रेसच्या राज्यातील भविष्याच्या वाटचालीवर हा निकाल परिणाम ठरणार आहे. तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निकाल शिवसेनेसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे नारायणे राणेंचे राजकीय भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून असणार आहे.

 
वांद्रे पूर्व विधानसभा निवडणुकीत तीन प्रमुख उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख चर्चा आहे ती काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे आणि शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सांवत यांच्या लढतीची. या लढतीचा निकाल काय लागतो. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याने या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. दोन्ही उमेदवारांच्या जय पराजयावर भविष्यातील अनेक राजकीय गणितं अबलूंन आहेत. त्यावरच एक नजर टाकूया...

या निवडणुकीत काँग्रेसचे नारायण राणे यांचा विजय झाला तर
-    शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात, मातोश्रीच्या अंगणात राणेंनी शिवसेनेला पाणी पाजले असे विश्लेषण केले जाईल

-    मालवणच्या पराभवानंतर राजकारणापासून काहीसे दूर केलेले राणे पुन्हा राजकारणात सक्रीय होतील

-    काँग्रेस पक्षात राणेंचं वजन वाढेल

-    राणेंच्या विजयामुळे राज्यभर काँग्रेसमध्ये एक नवचैतन्य येईल

-    राणेंच्या विजयामुळे विधानसभेत काँग्रेस आमदारांचे मनोबल वाढेल

-    प्रभावी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेल्या राणेंमुळे सत्ताधारी पक्षाची धास्ती वाढेल

-    विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राणेंकडे येऊ शकेल

-    राणे सरकारला सळो की पळो करून सोडतील

या निवडणुकीत राणेंचा पराभव झाला तर

-    नारायण राणेंची राजकीय कारकीर्द मातोश्रीपासून सुरू झाली आणि मातोश्रीच्या अंगणात तिचा शेवट  झाला असं या निकालाचं विश्लेषण केलं जाईल

-    नारायण राणेंच्या राजकीय कारकीर्दीला ग्रहण लागेल

-    काँग्रेसमधील निराशा आणखी वाढेल

-    नारायण राणेंचे राजकारणातील महत्त्व कमी होईल

-    राणेंच्या पराभवामुळे सत्ताधारी पक्ष आणि मंत्री सुटकेचा निश्वास सोडतील

नारायण राणेंविरोधात उभ्या असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांचा विजय झाला तर
-    शिवसेनेसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा असेल

-    राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मालवणमध्ये शिवसेनेचा पराभव केला होता, त्याचा बदला घेतल्याचे समाधान शिवसेनेला मिळेल

-    बालेकिल्ला सर केल्याचा आनंद शिवसेनेला असेल

-    मुंबई महापालिका निवडणुकीसाठी हा निकाल शिवसैनिकांना नवी चैतना देणारा ठरेल

तृप्ती सावंत यांचा पराभव झाला तर...

-    उद्धव ठाकरेंसाठी हा पराभव मानहानीकारक असू शकतो

-    मातोश्रीच्या अंगणात झालेला पराभव शिवसेनेसाठी मोठा धक्का असेल

-    मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो

-    मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपाबरोबर युती करायची झाली तर भाजपा या पराभवामुळे शिवसेनेला आणखी दाबण्याचा प्रयत्न करेल

-    पराभवाचे खापर काहीसे भाजपावर फोडले जाण्याची शक्यता, त्यामुळे दोन्ही पक्षात तेढ वाढू शकते

वांद्रे पोटनिवडणुकीचा निकाल काय लागतो याचे सगळ्यात जास्त टेन्शन नारायण राणे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे या दोघांना असणार आहे. कारण या दोघांची ताकद महाराट्राला दाखवणारा हा निकाल ठरणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.