www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दरवर्षीप्रमाणं यंदाही नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झालीय. थर्टी फर्स्टचे कार्यक्रमही अनेकांनी प्लान केलेत. राज्य उत्पादन शुल्क विभागानं बार आणि पब सकाळी पाचपर्यंत सुरू ठेवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलाय.
मात्र, यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून कुठलाही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे बार, रेस्टॉरंट रात्री दीड पर्यंत सुरू राहणार की पहाटे पाचपर्यंत याविषयी अनिश्चितता आहे. हॉटेल मालकांचीही चिंता वाढलीय. या विरोधात बार असोसिएशन कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्याचं व्यसन मुक्तीचं धोरण आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरला रात्रभर हॉटेलं आणि बार सुरू ठेवण्याच्या निर्णयाला सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी विरोध केलाय. एकीकडे राज्य व्यसनमुक्त करण्याचं ध्येय असताना ३१ तारखेला रात्रभर बार सुरू ठेवणं खेदजनक आहे असं ते म्हणाले. ही परवानगी मागे घेण्याचा आग्रह त्य़ांनी राज्य सरकारला केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.