मुंबई : रात्री मुंबई किती असुरक्षीत आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ही घटना आहे २१ डिसेंबर म्हणजे काल रात्री १०.३० वाजताच्या सीएसटी कर्जत लोकल ट्रेन मधील. घाटकोपरमध्ये चढलेल्या एका प्रवाशाला गाडीतील काही हुल्लडबाजांनी मारहाण केली.
या ग्रुपमधील एका युवकाने तर सरळ सीटवर चढून या युवकाला लाथांनी मारण्यास सुरावात केली. गाडीत हुल्लडबाजी करणारं हे टोळकं सीएसटीपासू गाडीत बसून आली होती. पीडित प्रवासी घाटकोपर स्थानकावर गाडीत चढल्यानंतर त्यांच्यात वाद झाला आणि शिवीगाळीहून प्रकरण थेट हाणामारीवर पोहोचलं.
या मारहाणीविरोधात रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये. मात्र मुंबई रेल्वेत वारंवार होणा-या अशा मारहाणीच्या घटनांमुळे मुंबईतील रात्रीचा रेल्वे प्रवास किती असुरक्षीत आहे हे पुन्हा एकदा उघडकीस आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.