मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्धापन दिनी 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राच्या पहिल्या पानावर आज अत्यंत मार्मिक छायाचित्रातून टीकास्त्र सोडण्यात आलंय. सामनाच्या पहिल्या पानावर आज एका सिंहाचा नरडीचा वाघानं घोट घेतल्याचं अफिक्रेच्या जंगलातलं छायाचित्र छापण्यात आलंय.
शिवाय वाघ एकला राज्याl या मथाळ्यानं छापलेल्या या छायाचित्रातून शिवसेनेनं भाजपच्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून होणाऱ्या राजकीय कुरघोडीच्या प्रयत्नांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. राज्य वाघाचे, सत्ता वाघाची आणि दराराही फक्त वाघाचाच, असा इशारा भाजपला देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
आफ्रिकेच्या जंगलातील हे थरारक दृश्य! इथे वाघाच्या इलाख्यात घुसण्याचा प्रयत्न करणार्या सिंहाच्या नरडीचा घोट वाघाने घेतला तो असा! वाघाचा इलाखा असतो, या इलाख्यात कोणी घुसायचे नसते, मग भले तो सिंह असेल, वाघ त्याच्या नरडीचा घोट घेतोच. कारण इथे राज्य वाघाचे, सत्ता वाघाची आणि दराराही फक्त वाघाचाच!