मुंबई : लाच स्वीकारण्याप्रकरणी भाजप नगरसेविका राजश्री श्रीपत पालांडे यांना शुक्रवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. ह
अनधिकृत बांधकामाविरुद्ध एमआरटीपी अंतर्गत कारवाईबाबत प्रशासनाने पाठविलेली नोटीस रद्द करण्यासाठी लाच स्वीकारण्यात आली. त्यासाठी एका व्यक्तीला लाच स्वीकारण्यास राजश्री पालांडे यांनी सांगितल्याचे पुढे आलेय. दरम्यान राजश्री पालांडे यांना अटक झाल्यानंतर शनिवारी त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आल्याचे समजते.
चेंबूर परिसरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी फिर्यादीवर पालिकेने एमआरटीपी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबतची नोटीस बजावली होती. ही नोटीस रद्द करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच राजश्री पालांडे यांनी मागितली होती. या संदर्भात फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.