मुंबई: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ स्थापत्यविशारद चार्ल्स कोरिया यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. ते 84 वर्षाचे होते.
साबरमतीतलं गांधींजीचं स्मारक, भोपाळमधली मध्यप्रदेश विधानसभेची इमारत, न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र संघासाठी भारताचं कार्यालय, गोव्यातली कला अकदामी आणि मुंबईतली प्रसिद्ध कांचनजुंगा इमारत अशा अनेक प्रसिद्ध इमारतीचं डिझाईन चार्ल्स कोरियांनी केलं होतं.
भारतीय स्थापत्य कलांमधल्या आविष्कारांचा त्यांच्या कामावर मोठा प्रभाव होता. नुकतचं कॅनडातल्या टोरँटो शहरात त्यांनी तयार केलेलं इस्लामिक सेंटर बांधून पूर्ण झालं. त्याचप्रमाणे अमेरिकेतल्या बॉस्टनमधल्या एमआयटीमध्ये त्यांनी ब्रेन सेंटरही बांधून पूर्ण केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.