www.24taas.com, अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई
दरोडे टाकणा-या एका महिलांच्या टोळीला गजाआड करुन मुंबई पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतलाय. गेल्या वर्षभरापासून या महिलांच्या टोळीनं मुंबई पोलिसांची झोप उडवली होती. त्यांची दरोडे टाकण्याची चलाखीही तशीच अचाट होती... मात्र अखेर या टोळीतल्याकाही महिलांना पोलीसांनी बेड्या ठोकल्याच.
कुलाब्यातल्या एका दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमे-यातलं दरोडे टाकणाऱ्या महिलांच्या टोळीचे दृष्य कैद झाले. राहायला घर नसल्यामुळे या महिला फुटपाथवर राहतात. अगदी गरिबीत या महिला आहेत असं तुम्हाला वाटेल. पण थांबा.. या महिला आहे अट्टल गुन्हेगार असल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे.
दुकानात घुसून एक महिलेने तब्बल 14 लाखांचे दागिने चोरले. फुटपाथवर राहणाऱ्या महिलांमधलीच ही महिला होती. दुकानासमोर फुटपाथवर गरीब असल्याचं भासवून या महिला राहतात. सकाळ झाल्यावर या महिला फुटपाथवर अंघोळ करतात. त्याचवेळी इतर महिला तिला आडोसा तयार करण्यासाठी ओढणी धरून उभ्या राहतात. पण त्या ओढणीच्या पल्याड लपून चक्क दुकानाचं कुलूप तोडलं जातंय. अशाच पद्धतीने या महिलांनी कुलाब्यातल्या दुकानात 14 लाखांचा दरोडा टाकला.
कुलाब्यात दरोडा टाकल्यावर या महिला त्याच परिसरात सावज हेरत होत्या. पण याच परिसरातल्या मयूर कोकम या तरूणाच्या सतर्कतेमुळे त्यांचे इरादे उधळले गेले
.
आत्तापर्यंत टोळीतल्या पाच ते सहा महिलांना अटक झाली असली तरी ही टोळी 50 ते 60 जणांची असल्याचा संशय आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. पण त्याचबरोबर मुंबईकरांनो सावधान!!!
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.