www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
आज राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळं सरकारकडून घोषणांचा पाऊस पडतोय. वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो सुरू झाल्यानंतर आता आज मुख्यमंत्र्यांनी नव्या मेट्रो मार्गाची विधानसभेत घोषणा केलीय. घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली-घोडबंदर रोड या मार्गाची घोषणा करण्यात आलीय.
घाटकोपर ते कासारवडवली हे 31 किमीचे अंतर असून घाटकोपर-कासारवडवली मार्गावर
29 स्टेशन्स उभारणार आहेत.
घोडबंदर आणि कासारवडवली परिसरातील रहिवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. कारण ठाण्याची लोकसंख्या पाहता वाहतूक कोंडीमधून ठाणेकरांची काही प्रमाणात सुटका होणार आहे.
ठाण्याच्या टीएमसीला वैतागलेल्या ठाणेकरांना मेट्रोचा उत्तम पर्याय असेल. ठाणे स्टेशनवर रोज साडे सहा लाख लोक प्रवास करतात, तो भार काही प्रमाणात का होईना मेट्रोमुळं कमी होणार आहे. दररोज ठाणेकर स्टेशनला उतरल्यानंतर बससाठी रांगाच रांगा लावून उभे असतात. मेट्रो स्टेशन्स त्यांच्या जवळपास आल्यानं मग त्यांची या त्रासातूनही सुटका होणार आहे.
पाहा कोणकोणती असतील स्टेशन्स
कासारवडवली - तीन हात- नाका – आनंदनगर- चेकनाका – वडाळा- घाटकोपर मार्ग
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.