मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला फासला हरताळ, टोल वसूली सुरुच

नोटांच्या गैरसोयीमुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या टोलपासून जनतेला मुक्ती देण्याची घोषणा केली असली तरी राज्यातल्या टोल कर्मचा-यांनी मात्र या निर्देशाला हरताळ फासलाय. 

Updated: Nov 9, 2016, 08:10 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला फासला हरताळ, टोल वसूली सुरुच title=

मुंबई : नोटांच्या गैरसोयीमुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या टोलपासून जनतेला मुक्ती देण्याची घोषणा केली असली तरी राज्यातल्या टोल कर्मचा-यांनी मात्र या निर्देशाला हरताळ फासलाय. 

वांद्रे वरळी सी लिंकवर टोल कर्मचा-यांनी वाहनधारकांकडून टोल वसुली सुरूच ठेवलीय. टोलमाफी बाबत सरकारकडून कुठलीही सूचना नसल्याचा दावा टोल कंत्राटदारांनी केलाय. उलट विचारणा करणा-यांवर मुजोरी करत टोलवसुलीही करण्यात येत आहे. आमच्या प्रतिनिधीनही थेट घटनास्थळावर जाऊन ही पोलखोल केली.

वाहनाच्या लांबच लांब रांगा

1000 आणि 500 च्या नोटांच्या बंदीमुळे मुंबईत शिरणाऱ्या सर्वच टोल नाक्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याचा फटका मनसे अद्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनाला बसला. वाहतूक कोंडी असल्याने पुण्याहून मुंबईला राज ठाकरे येत असताना वाशी टोल नाक्यावर त्यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राँग साईडनं आपली गाडी टाकून वाशी टोल नाक्यावर मुंबईत प्रवेश केला. यात राज ठाकरे यांची गाडी आणि पाठीमागून पोलिसांची गाडीही होती.