www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पहिल्यांदा कांदा, त्यानंतर टोमॅटोच्या किंमती वाढल्यानंतर आता अंड्याच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. संडे असो वा मंडे , रोज खा अंडे, असे म्हणणे आता शक्य नाही. कारण अंडे महाग झाले आहे. एक डझन अंड्यांची किंमत जवळपास ६४ रुपयांच्या घरात गेलीय. आणि ख्रिसमसच्या तोंडावर अंड्याची किंमत जवळपास ७० रुपयांवरही जाण्याची शक्यता आहे.
सोमवारी १०० अंड्यांची किंमत २८० ते ३०० रुपयांवरून ४२८ रुपयांवर पोहोचली. रिटेल मार्केटमधून होलसेल मार्केटमध्ये विक्री होताना प्रत्येक अंड्यामागे ५० पैसे आकारले जातात. गेल्या चार महिन्यांमध्ये अंड्याच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ झाल्यानं गृहिणींचं बजेटच कोलमडलंय.
अंड्यांच्या वाढत्या दरामुळे अंड्यांपासून तयार होणा-या पदार्थांचा दरही वाढलाय... अनेक कुटुंब मासे, मटण,चिकण परवडत नसल्यामुळे अंडी खाण्यास प्राधान्य देतात. मात्र आता एक अंड पाच रुपयांना मिळत असल्यामुळे अनेकांच्या खिशाला ते परवडत नाहीय.
याआधी कांद्यानं जवळपास ८० रुपयांपर्यंत गेला होता. तर त्यानंतर टोमॅटोनंही ८० रुपयांचा भाव गाठला होता. आता अंड्यांचा भाव वाढल्याने महागाईमध्ये सर्वसामान्य भरडला जात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ