स्वयंचलित दरवाज्यांची लोकल गेली लगेच मेन्टेनन्सला

रेल्वेच्या दरवाजाला लटकून प्रवास केल्याने होत असलेले अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने लोकल्सना स्वयंचलित दरवाजे लावण्याचा निर्णय घेतला. त्याची पश्चिम रेल्वेला अमंलबजावणीही झाली, पण लगेच दुसऱ्या दिवशी ही गाडी मेन्टेनन्सला पाठविण्याचा अजब निर्णय घेण्यात आला. 

Updated: Mar 16, 2015, 07:23 PM IST
स्वयंचलित दरवाज्यांची लोकल गेली लगेच मेन्टेनन्सला

मुंबई : रेल्वेच्या दरवाजाला लटकून प्रवास केल्याने होत असलेले अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने लोकल्सना स्वयंचलित दरवाजे लावण्याचा निर्णय घेतला. त्याची पश्चिम रेल्वेला अमंलबजावणीही झाली, पण लगेच दुसऱ्या दिवशी ही गाडी मेन्टेनन्सला पाठविण्याचा अजब निर्णय घेण्यात आला. 

या निर्णयाची अंमलबजावणी ही करण्यात आली तेही रविवारी लेडीज फर्स्ट क्लास डब्यांना हे दरवाजे प्रायोगिक तत्वावर बसविले.  पण अगदी दुसऱ्याच दिवशी मेन्टेनन्सच्या नावाखाली ही सेवा बंदही ठेवण्यात आली, त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी तरी प्रवाशांना या स्वयंचलित दरवाजांचा अनुभव घेता आला नाही.

पश्चिम रेल्वे जनसंपर्क अधिका-यांनीच ही माहिती दिली. पण मग स्वयंचलित दरवाजे असलेली ही लोकल रविवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी घोषणा का करण्यात आली, उद्या तरी ही सेवा सुरु होणार का याची उत्तरं रेल्वे अधिका-यांकडे नाहीत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.