मुंबई : सहकारी कारखान्यांमध्ये घोटाळा झाला असून यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा समावेश असल्याचा आरोप अण्णा हजारेंनी केला होता. या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीची याचिका अण्णा हजारेंनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. अण्णा हजारेंची ही याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. याप्रकरणी पहिले सहकारी कारखान्यांची तक्रार दाखल करा असं सांगत न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण अण्णा हजारे यांच्यावर मानहानीचा दावा करण्याच्या मनस्थितीत असल्याचं म्हटलं आहे.