www.24taas.com, मुंबई
दिल्ली गँगरेप नंतर महिलांचा प्रश्न ऐरणीवर आला. आणि त्याने संपूर्ण देश ढवळून निघाला. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा विचार करता आता राज्य शासनाने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच एसटीनं पुढाकार घेतला आहे. एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी एसटी प्रशासनानं नवे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार चालत्या एसटीत एखाद्या महिलेची समाजकंटकाकडून छेड काढली जात असेल तर चालकाने सरळ बस नजीकच्या पोलीस ठाण्यात न्यावी असे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय एसटीच्या आगारांमध्ये असलेल्या पोलीस चौक्यांमध्ये महिलांसाठी मदत केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.
बसमध्ये आरक्षित असलेली आसनं महिलांनाच कशी मिळतील याची जबाबदारी ही वाहकांची असणार आहे. महिलांना कोणात्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्यांनी वाहकाला लगेचच त्याची तक्रार करावी..