महागाईचा निर्देशांक वाढला, भाज्याही महागल्या!

सामान्यांना चिंतेत टाकणारी एक बातमी... सलग दुसऱ्या महिन्यात महागाईच्या निर्देशांकात वाढ झालीय. महागाईचा निर्देशांक ५.७६ टक्क्यांवर गेलाय. अन्नधान्य आणि भाज्यांच्या वाढत्या दरामुळं महागाईचा निर्देशांकांत वाढ झालीय. या वाढत्या महागाई निर्देशांकांमुळं व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. निर्देशांक असाच वाढता राहिल्यास रिझर्व्ह बँकेला व्याज दर कपात करणं कठीण होणार आहे. 

Updated: Jun 14, 2016, 08:11 AM IST
महागाईचा निर्देशांक वाढला, भाज्याही महागल्या! title=

मुंबई : सामान्यांना चिंतेत टाकणारी एक बातमी... सलग दुसऱ्या महिन्यात महागाईच्या निर्देशांकात वाढ झालीय. महागाईचा निर्देशांक ५.७६ टक्क्यांवर गेलाय. अन्नधान्य आणि भाज्यांच्या वाढत्या दरामुळं महागाईचा निर्देशांकांत वाढ झालीय. या वाढत्या महागाई निर्देशांकांमुळं व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. निर्देशांक असाच वाढता राहिल्यास रिझर्व्ह बँकेला व्याज दर कपात करणं कठीण होणार आहे. 

भाज्यांची आवक रोडावली

जून महिना अर्धा संपत आलाय, मान्सून काहीसा लांबलाय आणि भाज्यांची आवकही कमालीची रोडावली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागलीय.

बहुतांश भाजांनी शंबरी पार केल्यामुळे गृहिणींचं बजेट पूर्णतः कोलमडलंय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दुपटीने ते तिपटीने भाव वाढलेत. कोथिंबीर, टोमॅटो, मेथी, गवार, दोडका कारली सर्वच भाज्या तुफान महागल्या आहेत. पावसाचा पत्ताच नसल्याने पुढील काही आठवडे भाज्यांचे दर असेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

नाशिक जिल्ह्यातून बहुतांश राज्याला भाजीपुरवठा होतो. नाशिकची भाजी राज्याच्या बाहेरही जाते. मात्र यावर्षी नाशिक जिल्ह्याने प्रचंड मोठा दुष्काळ सहन केलाय. त्यामुळे नाशिकमधलं भाजीपाल्याचं उत्पादन कमालीचं घटलंय. त्यामुळे घाऊक बाजारात दर कमालीचे चढे आहेत.