मुंबई : बिहारमध्ये दंबंगगिरी करणारा महाराष्ट्राचा आयपीएस शिवदीप लांडे यांनी एका मंत्र्याच्या मुलीशी विवाह केला आहे. शिवदीप यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे आमदार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांची मुलगी ममता हिच्याशी केला आहे.
खरंतर हा विवाह दोन वर्षापूर्वीच पार पडलाय, पण शिवदीप लांडे हे आता महाराष्ट्रात आपली बदली करून घेणार असल्याने हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे.
दबंग, सिंघम अशी ख्याती असलेले आयपीएस शिवदीप लांडे हे मात्र एका शेतकरी कुटूंबातून आहेत. ममता या मुंबईत लहानाच्या मोठ्या झाल्या. ममता यांचं बालपण साधारण मुंबईतील चाळीत गेले मात्र शिवतारे यांनी बांधकाम व्यवसायात उडी घेतली आणि आपली आर्थिक प्रगती केली.