मुंबई : एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल, अशी फिल्मी स्टाईलची चोरी विरारमध्ये एका सराफाच्या दुकानात झाली आहे. सुनियोजित कट रचून दोन कोटी एक्केचाळीस लाखांचा सोन्या-चांदीचा माल चोरट्याने लंपास करुन फ़रार झाले आहेत.
विरार पश्चिमला गोकुळ टाऊनशिप येथील ओमकार ज्वेलर्सच्या दुकानात ही घटना घडली आहे. सराफाच्या दुकानाला लागुनच असलेला गाळा भाड्याने घेऊन रेकी करुन ही चोरी केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सराफाच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्यात आली.
चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत. या चोरट्यांनी दुकानातील सीसी टीव्ही कॅमेरे आणि त्याची हार्ड डिस्कपण चोरून नेली आहे. त्यामुळे चोरीचा तपास लागणे अवघड झाले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.