लालूंवर मुंबईत शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. सध्या लालू प्रसाद यादव यांच्यावर एशियन हार्ट इन्स्टीट्यूटमध्ये उपचार सुरू आहेत.

Updated: Aug 26, 2014, 04:30 PM IST
लालूंवर मुंबईत शस्त्रक्रिया होण्याची शक्यता title=

मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. सध्या लालू प्रसाद यादव यांच्यावर एशियन हार्ट इन्स्टीट्यूटमध्ये उपचार सुरू आहेत.

लालूजींची प्रकृती तशी चिंताजनक नाही, मात्र हृदय विकाराच्या शस्त्रक्रियेची खरोखर गरज आहे का हे आम्ही तपासून पाहत असल्याचं डॉ.विजय डी सिल्वा यांनी म्हटलं आहे.

काही वैद्यकीय चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर लालू यादव यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे का? हे स्पष्ट होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

लालू यादव यांचं वय 66 वर्ष आहे, ते काल रूटीन चेकअपसाठी एशियन हार्ट इन्स्टीट्यूटला आले होते. हृदय विकाराच्या तक्रारीनंतर त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.