मुंबई : मालेगाव स्फोटाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय चौकशी संस्थेनं (NIA) साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिला क्लीन चीट दिलीय.
एनआयएनं शुक्रवारी मुंबईच्या एका न्यायालयात सादर होणाऱ्या चार्जशीटमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह हिच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह हिच्या सुटकेचा मार्ग मोकळा होताना दिसतोय.
सूत्रांच्या माहितीनुसार, चार्जशीटमध्ये केलेल्या उल्लेखानुसार २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्र एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांनी केलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासात काही उणीवा होत्या. इतकंच नाही तर कर्नल प्रसाद पुरोहित आणि दुसरे मुख्य आरोपींविरुद्ध जे पुरावे दाखल केले गेले ते धादांत खोटे खोते तसंच प्रत्यक्षदर्शींवर दबाव टाकून त्यांचे जबाब नोंदवले गेले होते.
इतकंच नाही तर, हे आरडीएक्स एटीएसनंच घटनास्थळी ठेवले होते, हे सिद्ध करणारे पुरावेही आपल्याकडे असल्याचं एनआयएनं म्हटंलय. एटीएसनं २००८ साली कर्नल पुरोहित यांच्या अटकेपूर्वी देवळाली आर्मी कॅम्प स्थित त्यांच्या क्वार्टरमध्ये विस्फोटक प्लान्ट केले होते.
चौकशी समितीनं आरोपी कर्नल पुरोहित आणि इतर आरोपींविरुद्ध लावण्यात आलेला मोक्का हटवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्याविरुद्ध बेकायदेशीर कामांत सहभागी होण्याचा आणि कट रचण्याचा आरोप आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास ७९ जण जखमी झाले होते.