मुंबई : मिनरल वॉटर आणि कोल्ड्रिंगसाठी छापील किमतीपेक्षा दोन रुपये अधिक दुकानदार घेत असतील तर आता तुम्हाला थेट तक्रार करता येणार आहे. त्यामुळे यापुढे दुकानरांबरोबरच कंपनी ताळ्यावर येणार आहे.
कोल्ड्रिंग असो, मिनरल वॉटर अथवा दूध, थंड ठेवण्याच्या नावाखाली दुकानदार आणि व्यापाऱ्यांकडून छापील किंमतीपेक्षा अधिक किंमत आकारण्याचे प्रकार सर्वत्र घडत दिसत आहे. काहीवेळा ग्राहक आणि दुकानदारांमध्ये वाद होतो. आता वाद घालण्याची ग्राहकाला गरज पडणार नाही. थेट तक्रार नोंदवण्याकरिता ग्राहक नागरिकांसाठी वैध वजन व मापे विभागाने आता एक व्हॉट्स अॅप नंबर सुरु केला आहे.
ग्राहाकांनी ९८६९६९१६६६ या 'व्हॉट्सअॅप' नंबरवर आपल्या तक्रारी नोंदवता येतील. यावर फोन करता येणार नाही. जर फोनवर तक्रार नोंदवायची असल्यास ०२२-२२८८६६६६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
जास्त किमत आकारणाऱ्यांविरोधात वजन व मापे विभागाने गेल्या काही दिवसांपासून मोहीम सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तक्रार नोंदविण्यासाठी हे दोन नंबर सुरु करण्यात आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.