सिंधुरत्न पाणबुडीला अपघात, दोघे जखमी

मुंबई किनारपट्टीजवळ सिंधुरत्न पाणबुडीला अपघात झाल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या अपघातात दोघे जखमी झाल्याचे म्हटले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 26, 2014, 02:58 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
मुंबई किनारपट्टीजवळ सिंधुरत्न पाणबुडीला अपघात झाल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले असून दोघे बेपत्ता आहेत.
भारतीय नौसेनेची ही पाणबुडील असून पाच नौसेैनिक जखमी झालीची माहिती देण्यात आलेय.पाणबु़डीतून अचनाक धूर येऊ लागल्याने घबराट परसली. मात्र, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
पाणबुडीतील नौसेनिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे काहीजण बेशुद्ध झाले. या नौसैनिकांना एअरलिफ्ट करुन नौदलाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. सात जणांना वाचवण्यात यश आलंय. अद्याप ठोस माहिती हाती आलेली नाही.
भारतीय नौसेनेच्या सिधुरत्न या पाणबुडीला मुंबई किनारपट्टीजवळ अपघात झाला. किलो क्लास वर्गातील पाणबुडीला हा अपघात झालाय. या पाणबुडीतून धूर निघाल्याचंही सांगण्यात येतंय. सिंधुरत्न मध्ये धूर निघाल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, याआधी गेल्याच वर्षी १४ ऑगस्ट २०१३ ला सिंधुरक्षक पाणबुडीला मुंबई बंदराजवळ मोठा अपघात झाला होता. या अपघातात १८ नौसैनिकांचा मृत्यू झाला होता. पाणबुडयांच्या वारंवार होत असलेल्या अपघातांबद्दल चिंता व्यक्त होतेय.
नियमित सरावादरम्यान ही घटना घडली असल्याचं नौदलाच्या जनसंपर्क अधिका-यांनी झी मीडियाला सांगितलंय.. त्यांना रशियन बनावटीच्या डिझेल आणि इलेक्ट्रिकवर चालणा-या पाणबुडीचं किलो क्लास असं वर्गीकरण केलं जातं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.