मुंबई : काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यांच्याविरोधात दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.
गुजरात्यांनी मोदींबरोबर गुजरातमध्ये निघून जावे, असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं. हे वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारं असून राणेंवर कारवाई करण्यात यावी अशी याचिका भगवानजी रयानी यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.
याप्रकरणी नितेश राणेंविरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. बेलापूर स्पेशल सीआयडी त्याचा तपास करत आहे. याप्रकरणी सीआयडीनं काय तपास केला, याचा अहवाल येत्या दोन आठवड्यात सादर करावा, असे आदेश मुंबई हायकोर्टानं आज दिलेत. त्यामुळं हे वक्तव्य नितेश राणेंना चांगलंच महागात पडणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.