मनसे नेत्या शिल्पा सरपोतदार शिवसेनेत दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस शिल्पा सरपोतदार यांच्याकडे पदभार असला तरी त्यांना पक्षात तसे स्थान न दिल्यांने त्यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर त्यांचे स्वागत केले. 

Updated: Aug 14, 2015, 09:17 AM IST
मनसे नेत्या शिल्पा सरपोतदार शिवसेनेत दाखल title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस शिल्पा सरपोतदार यांच्याकडे पदभार असला तरी त्यांना पक्षात तसे स्थान न दिल्यांने त्यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर त्यांचे स्वागत केले. 

शिवसेनेचे दिवंगत नेते मधुकर सरपोतदार यांच्या सूनबाई आहेत. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली तेव्हापासून मधुकर सरपोतदार यांचा मुलगा अतुल सरपोतदार आणि शिल्पा सरपोतदार मनसेत कार्यरत होते.  दरम्यान, त्यांच्या मुलाने याआधीच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते नाराज होते. शिल्पा सरपोतदार यांची मनसेत कोंडी होऊ लागली होती. पक्षातील त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

मनसेच्या वरच्या फळीतील नेत्यांमध्ये अतुल आणि शिल्पा सरपोतदार यांची गणना होत होती. मनसेची महिला आघाडी उभारण्याचे कार्य श्‍वेता परुळेकर, शिल्पा सरपोतदार आणि शालिनी ठाकरे यांनी केले. श्‍वेता परुळेकर यांनी पाच वर्षांपूर्वीच मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याकडे शिवसेनेच्या प्रवक्तेपदाची जबाबदारीही देण्यात आली. त्यानंतर मनसेच्या महिला आघाडीचे कार्य शिल्पा सरपोतदार यांच्याकडे होते.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार प्रवीण दरेकर, राम कदम, वसंत गीते, हाजी अराफत शेख यांनी राज ठाकरे यांची साथ सोडली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.