विधानसभा २०१४: राज्यभरात मनसे लढविणार 200 जागा

 राज्यभरात 200 उमेदवार उभे करण्याची मनसेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तुलनेनं कमी उमेदवार उभे केले जाणार आहेत. नावांची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असं पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

Updated: Sep 21, 2014, 10:26 AM IST
विधानसभा २०१४: राज्यभरात मनसे लढविणार 200 जागा title=

मुंबई:  राज्यभरात 200 उमेदवार उभे करण्याची मनसेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तुलनेनं कमी उमेदवार उभे केले जाणार आहेत. नावांची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असं पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

एका वृत्तपत्राशी बोलताना नांदगावकर म्हणाले, आम्ही मराठवाडय़ात जवळपास सर्व जागांवर उमेदवार देणार आहोत. विदर्भातही जवळपास 35 ते ४० उमेदवार निश्चित केले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नाशिक या ठिकाणच्या सगळ्या जागा मनसे लढणार आहे. प. महाराष्ट्रातही उमेदवार उभे करत आहोत. येत्या 25 सप्टेंबर रोजी, मनसेचं व्हिजन डॉक्युमेंट मुंबईत सादर होणार आहे. सत्ता आली तर राज्यात काय करायचे याचं विस्तृत चित्र त्यात असेल, असंही नांदगावकर म्हणाले. 

दरम्यान, भाजपा-सेना आणि दोन्ही काँग्रेस यांचं काय होतं त्यानुसार कोणासोबत जायचं, किती जागा कोणासाठी सोडायच्या याचं गणित सध्या मनसेत चालू आहे. 25 तारखेला राज ठाकरे प्रचाराचा शुभारंभ करणार असून, त्या वेळी ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

भाजपाकडून राजना बुके!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या आजारी आहेत. त्यांना लवकर आराम पडावा म्हणून भाजपाच्या दिल्लीतील एका वरिष्ठ नेत्यानं ‘गेटवेल सून’ म्हणत त्यांना पुष्पगुच्छ पाठवल्याचं समजतं. राज्यातल्या बदलत्या समिकरणाच्या पार्श्वभूमीवर या पुष्पगुच्छालादेखील महत्त्व आलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.