147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींचा आज फैसला

राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींधील दिग्गजांचा आज फैसला होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात होईल. 

Updated: Nov 28, 2016, 07:33 AM IST
147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींचा आज फैसला title=

मुंबई : राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींधील दिग्गजांचा आज फैसला होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात होईल. 

पहिल्या टप्प्यातील या निवडणुकीचा निकाल दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे. निकालानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. रविवारी 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींसाठी सरासरी 70 टक्के इतके मतदान झालं. भाजप शिवसेना युतीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं निमशहरी मतदारांनी मतदान केलं. 

नोटबंदीच्या निर्णयानंतर होणा-या या निवडणुकीचा कौल कुणाला मिळतो हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. 164 नगरपालिकांमध्ये थेट नगराध्यक्षपदासाठी मतदान हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठीच्या 147 जागांसाठी एक हजार 13 उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवकांच्या तीन हजार 733 जागांसाठी 15 हजार 827 उमेदवार नशिब आजमावतायत. 

नगरपालिकांमध्ये दोन किंवा तीन सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. तर नगर पंचायतींमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. बत्तीस शिराळामध्ये नागरिकांनी बहिष्कार टाकल्याने १७ नगर पंचायतींसाठी मतदान झालं. त्यामुळं मतदारराजानं कुणाला कौल दिला याचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे.