मुंबई : विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकऱणी डहाणूकर कॉलेजच्या प्राध्यापकाला अटक करण्याता आली आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप डहाणूकर कॉलेजच्या प्राध्यापकावर आहे.
प्राध्यापकाला दोन दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावण्यात आी आहे. बारावीच्या वर्गात असलेल्या विद्यार्थिनीला विले पार्लेमधील डहाणूकर कॉलेज परीक्षा केंद्र म्हणून आले.
परीक्षेसाठी ही मुलगी सोमवारी १८ जुलै रोजी कॉलेजला आली. पेपर लिहीत असताना वर्गावर पर्यवेक्षक म्हणून महेंद्र भंडारे आला, त्याने या तरुणीचा विनयभंग केल्याचं तक्रारीत म्हटलंय.