'विरोध गुलाम अलींना नव्हे तर पाकिस्तानला'; सेना नरमली

गुलाम अली यांच्या कार्यक्रमात खोडा घातल्यानंतर आता शिवसेनेनं आपली भूमिका काहीशी मवाळ केलीय.

Updated: Oct 8, 2015, 01:23 PM IST
'विरोध गुलाम अलींना नव्हे तर पाकिस्तानला'; सेना नरमली title=

मुंबई : गुलाम अली यांच्या कार्यक्रमात खोडा घातल्यानंतर आता शिवसेनेनं आपली भूमिका काहीशी मवाळ केलीय.

आपला गुलाम अली यांना व्यक्तिगत विरोध नाही... मात्र पाकिस्तानी कलाकारांना आपला विरोध आहे, असं शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

वादाच्या पार्श्वभूमीवर गुलाम अली यांचा मुंबई पाठोपाठ पुण्यात 10 ऑक्टोबर रोजी होणारा नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आलाय. त्यानंतर ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केलीय. तर केंद्र सरकारनं पाकिस्तानी कलाकारांना व्हिसाच देऊ नये, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये केलीय.

काश्मीरमध्ये आपले सैनिक शहीद होत असताना आम्ही त्यांचं गाणं ऐकत बसू का? असा सवाल शिवसेनेनं केलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.