मुंबई : मुंबई विकास आराखडा रद्द केल्याच्या निर्णयाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वागत केलंय. मुंबईकरांच्या रेट्यामुळं हा विकास आराखडा रद्द करण्यात आलंय.
विकास आराखडा तयार करण्यासाठी खर्च झालेले आठ कोटी पाण्यात गेले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही राज ठाकरे यांनी केली.
मुंबईचा नवा वादग्रस्त विकास आराखड अखेर रद्द करण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.
नवा विकास आराखडा पुढील चार महिन्यांत नव्यानं सादर करण्याचे आदेश राज्य सरकारनं मुंबई महापालिकेला दिले आहेत. विकास आराखड्यात अनेक त्रुटी होत्या. त्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता.
सर्वच राजकीय पक्षांनी या विकास आराखड्याला विरोध दर्शवला होता. त्यामुळं हा विकास आराखडा मंजूर होण्याची शक्यता यापूर्वीच मावळली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.