www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यसभेसाठी रामदास आठवलेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. २८ जानेवारीला आठवले राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील.
आठवलेंच्या उमेदवारीवर २७ तारखेला अंतिम निर्णय घेण्याची औपचारिकता पार पाडली जाणार आहे. आठवलेंना महाराष्ट्रातूनच उमेदवारी द्यावी, असा ठराव महायुतीने केला आणि तो भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठवण्यात आलाय.
भाजपच्या प्रकाश जावडेकर यांच्याऐवजी आठवलेंना राज्यसभेत महायुतीतर्फे पाठवलं जाणार आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी रामदास आठवले आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात चर्चा झाली. रामदास आठवले लोकसभेच्या तीन जागांवर अजूनही आग्रही आहेत. त्यामुळे त्यावेळी ही चर्चा अपूर्ण राहिली होती. त्यानंतर या रामदास आठवले यांच्यासह उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि भाजप सेनेच्या इतर नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत आठवले यांच्या राज्यसभेच्या जागेवर शिक्कामोर्तब झालं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.