मुंबई : राज्य सरकारी कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सरकारी कर्मचा-यांचे वय ५८ वरुन ६० करण्याच्या निर्णयाप्रत राज्य सरकार आल्याचं बोललं जातं आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महिन्याच्या अखेरीस अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
राज्याच्या प्रशासनात सुमारे पावणे दोन लाख कर्मचा-यांच्या जागा रिक्त आहेत. सेवानिवृत्तीचे वय वाढल्यास अनुभवी कर्मचा-यांमुळे प्रशासनाच्या कामकाजाची गती वाढवण्यास मदत होईल असं सांगितलं जातं आहे.
तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, अरुणाचल प्रदेश आणि तेलंगणा ही सहा राज्य वगळल्यास देशातल्या २२ राज्यांमध्ये कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. केवळ दक्षिणेतील केरळ या एकमेव राज्यात सेवानिवृत्तीचे वय 56 वर्षे इतके आहे.