सेनेच्या आक्रमकपणामुळे भाजप पळाले - सामना

विश्वासदर्शक ठरावावेळी विधिमंडळात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून समाचार घेण्यात आलाय.

Updated: Nov 13, 2014, 01:41 PM IST
सेनेच्या आक्रमकपणामुळे भाजप पळाले - सामना title=

मुंबई : विश्वासदर्शक ठरावावेळी विधिमंडळात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून समाचार घेण्यात आलाय.

सामनाच्या पहिल्या पानावर लोकशाहीचा खून झाल्याची स्कायलाईन करुन भाजपला टार्गेट करण्यात आलंय. विरोधी बाकावर बसलेली शिवसेना पहिल्याच दिवसापासून आक्रमक झाल्याचा उल्लेख सामनाच्या बातमीत पाहायला मिळतोय. शिवसेनेच्या आक्रमणापुढे भाजप सरकार पळाल्याची टीका भाजपवर करण्यात आलीय. सरकारवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी कांगावा केल्याचं वृत्त सामनानं आतल्या पानावर छापलंय.

दुसरीकडे राज्यपालांची गाडी रोखल्याच्या वृत्ताला मात्र आतल्या पानावर स्थान देण्यात आलंय. तर या सगळ्या प्रकारात भाजप आमदार गिरीश महाजन काय करत होते? असं फोटो वृत्त मात्र पहिल्या पानावर छापण्यात आलंय तर अग्रलेखातूनही विश्वासदर्शक ठरावावर अविश्वास दाखवण्यात आलाय. आवाजी मतदानाची पळवाट शोधून पळ का काढला? अशी टीका अग्रलेखातून करण्यात आलीय.

काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात... पाहुयात... 

विधिमंडळाच्या पवित्र सभागृहात विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर करुन घेण्यासाठी सत्ताधारी मंडळींकडून काय काय लटपटी झाल्या, नियम आणि प्रथा-परंपरांचे कसे उल्लंघन झाले याचे दर्शन बुधवारी राज्यातीलच नव्हे तर देशातील जनतेला झाले आवाजी मतदानाची पळवाट शोधून पळ कशासाठी काढला. तुम्ही आवाजी मतदानाने सभागृहात विश्वास संपादन केला असला तरी हे कसले बहुमत? विश्वासमताची 'ढकलगाडी' सहा महिन्यांपुरती ढकलण्यात तुम्हाला भलेही यश आलं असेल... पण जनतेच्या मनातील तुमच्या विश्वासाचे गाडे आजपासून उतरंडीला लागले आहे एवढे लक्षात घ्या - सामना

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.