संजय दत्त भाजपच्या कार्यक्रमात

पुणे येरवडा कारागृहातून बाहेर आल्यानंतर, अभिनेता संजय दत्त रविवारी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसला. विशेष म्हणजे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाशी जवळीक असणारा संजय दत्त थेट भारतीय जनता पक्षाच्याच मुंबईतल्या कार्यक्रमात दिसून आला. 

Updated: May 2, 2016, 08:24 AM IST
संजय दत्त भाजपच्या कार्यक्रमात

मुंबई : पुणे येरवडा कारागृहातून बाहेर आल्यानंतर, अभिनेता संजय दत्त रविवारी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसला. विशेष म्हणजे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाशी जवळीक असणारा संजय दत्त थेट भारतीय जनता पक्षाच्याच मुंबईतल्या कार्यक्रमात दिसून आला. 

निमित्त होतं मुंबई भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं. 

पुढल्या वर्षी होणा-या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मोहित कम्बोज यांना जिंकून देण्याचं आवाहनही, यावेळी बोलताना संजय दत्तनं केलं.