मुंबई : शीना हत्याप्रकरणी पेणच्या जंगलात मुंबई पोलिसांना महत्वाचे पुरावे सापडले आहेत. खोदकामात 10 ते 12 मानवी हाडं आढळलीत. आता डीएनए चाचणीनंतर गुढ उलगडण्यास मदत होणार आहे.
शीना बोरा हत्याकांड प्रकरणी महत्वाचे पुरावे पोलीसांच्या हाती लागले आहेत. रायगड जिल्ह्यातील गागोदे गावच्या जंगलात शीना बोरा हिचा मृतदेह फेकण्यात आला होता तेथे केलेल्या खोदकामानंतर 10 ते 12 हाडे पोलीसांच्या हाती लागली आहेत. आज सकाळपासूनच मुंबई पोलीसांच्या पथकाने स्थानिक पोलीस व नागरीकांच्या मदतीने गागोदे जंगलात खोदकाम सुरू केले. यावेळी सुमारे 10 ते 12 ठिकाणी खोदल्यानंतर हाडे पोलीसांच्या हाती लागली आहेत.
अधिक वाचा : Exclusive : शीना बोराचा मृतदेह या ठिकाणी गाडण्यात आला. फोटो पाहा
भर पावसात 6 ते 7 तास हे खोदकाम सुरू होते. मुंबईतील कलिना येथील न्याय वैद्यक प्रयोग शाळेचे पथकही येथे दाखल झाले होते. या पथकाने ही सर्व हाडे ताब्यात घेतली आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच या हत्याकांडातील पुढील बाबींचा उलगडा होणार आहे.
इंद्राणीची मागणी कोर्टाने फेटाळली
शीना बोराचा सख्खा भाऊ मिखाईलला पोलिसांनी मुंबईत आणलंय...त्याच्याकडे 4 फोटो, काही कागदपत्रं, एक ऑडिओ क्लिप आहे. या पुराव्यांच्या आधारे आणि त्याचा जबाब घेतल्यानंतर पुन्हा इंद्राणीची चौकशी केली जाणार आहे. तसंच मिखाईलनंतर पोलिसांनी पीटरनाही पाचारण केलं. खार पोलीस स्टेशनमध्ये आजच पीटर यांचाही जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे . दरम्यान इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्नाला पोलिसांनी अटक केलीये. कोर्टानं त्याला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये. घरचे जेवण आणि कपडे मिळावे यासाठी त्यानं केलेला अर्ज कोर्टानं फेटाळलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.