मुंबई : उत्सवानिमित्त स्पॉईस जेटने प्रवाशांना मोठी सूट देण्याची योजना केली आहे. या योजनेनुसार देशांतर्गत प्रवासाठी फक्त 1,888 रूपये तिकीट आकारलं जाणार आहे.
महत्वाचं म्हणजे या योजनेत प्रवाशांचा फायदाच आहे. मात्र 27 ऑगस्ट 2014 पर्यंत बुकिंग करणाऱ्यांसाठी ही योजना आहे.
तसेच तुम्हाला 25 सप्टेंबर 2014 ते 15 जानेवारी 2015 पर्यंत या कमी भाड्यात प्रवास करता येणार आहे.
तसेच ऑफरमधील तिकीट बुक केल्यानंतर कोणताही बदल केला जाणार नाही, आणि या तिकीटचे पैसे नॉन रिफंडेबल आहेत, ही ऑफर फस्ट कम फस्ट बेसिसवर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.