मुंबई: राज्यात अवकाळी पावसानं ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या माहितीनंतर गोंधळ झाला. राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ६०१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मग अशी चुकीची माहिती राज्य सरकारनं केंद्राला का दिली? असा सवाल विरोधकांनी विचारला.
याचं उत्तर देतांना राज्याचे महसूल आणि कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी जो प्रश्न विचारला केंद्रीय कृषिमंत्र्यांनी त्याचंच उत्तर दिल्याचं म्हटलं. खडसे म्हणाले, राज्यात एकूण ६०१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या जानेवारीपासून आतापर्यंत झाल्या आहेत. पण त्यातील केवळ ३ शेतकऱ्यांनी आपण अवकाळी पावसामुळं आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय. इतर शेतकऱ्यांनी कर्जबाजारी पणा आणि इतर कारणांनी आत्महत्या केल्यात.
त्यामुळं लोकसभेत अवकाळी पावसानं किती आत्महत्या झाल्या या प्रश्नाचं केंद्रीय कृषिमंत्र्यांनी योग्यच उत्तर दिल्याचं खडसे म्हणाले. राज्यानं संपूर्ण अहवाल पाठवला आहे आणि त्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची योग्य माहिती दिल्याचं खडसे म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.