मुंबई : डॉक्टरांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी निवासी डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांची पुर्तता करण्यासाठी राज्य सरकारने सुरुवात केली आहे. हॉस्पिटलमध्ये अलार्म यंत्रणा असावी अशी एक मुख्य मागणी डॉक्टरांनी केली होती. त्यानुसार आता KEM हॉस्पिटल पासून या सुविधेची सुरुवात झाली आहे.
KEM मधील अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग या मध्ये ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.