www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पोलीस भरती दरम्यान चार उमेदवारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हायकोर्टाने सुमोटा याचिका दाखल केली आहे.
म्हणजेच कोणाचीही याचिका नसतांना, प्रकरणाचं गांभीर्य पाहून स्वत:हून न्यायालयाने ही `सुमोटो याचिका` दाखल केली आहे.
या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकार, गृहखातं आणि पोलिस महासंचालकांना नोटीस पाठवली आहे.
पोलीस भरती दरम्यान चार उमेदवारांचा मृत्यू झाल्याने, या प्रकरणी सात दिवसात उत्तर देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
पोलीस भरती दरम्यान होणाऱ्या शारिरिक चाचणीत चार उमेदवारांचा मृत्यू झाला आहे. चाचणीसाठी धावतांना हा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
ही पोलिस भरती मोठ्या प्रमाणावर असल्याने शारिरिक चाचणीचे नियम पाळले जात नसल्याचेही आरोप होत आहेत.
सकाळी आणि संध्याकाळीच ही चाचणी होते. मात्र भर दुपारी उन्हात धावल्यामुळे हे मृत्यू ओढवल्याचा आरोप होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.