मुंबई, ठाण्यात टॅक्सी, रिक्षा भाडेवाढ

रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवास भाड्यात १ जूनपासून १ रूपयाची वाढ करण्यात येणार आहे. मुंबई आणि ठाण्यात ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.

Updated: May 11, 2015, 07:52 PM IST
मुंबई, ठाण्यात टॅक्सी, रिक्षा भाडेवाढ title=

मुंबई : रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवास भाड्यात १ जूनपासून १ रूपयाची वाढ करण्यात येणार आहे. मुंबई आणि ठाण्यात ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.

एमएमआरटीएच्या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावावर निर्णय झाला. यानुसार मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडे सरासरी एक रुपयाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

जून महिन्यापासून टॅक्सी आणि रिक्षाला जास्त भाडे द्यावे लागणार आहे, या एका महिन्याच्या काळात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना त्यांचं मीटर नव्या भाड्याप्रमाणे सेट करण्यास वेळ मिळणार आहे.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.