मुंबई/रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून राज्यातलं हवामान बिघडलंय. अनेक ठिकाणी पाऊस होतोय. कोकणात पावसाने दोन दिवस मुक्काम ठोकलाय. तर अनेक ठिकाणी ढगाळ हवा आहे.
अचानक वातावरणात बदल झालाय. हे वातावरण डेंग्यूसाठी घातक आहे. अशाच वातावरणात डेंग्यूचा उद्रेक होतोय. त्यासाठी आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत डेंग्यूचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. शहरात 3206 डेंग्यूचे रूग्ण आहेत. 8 जणांचा डेंग्यूने बळी घेतलाय. अशा परिस्थितीत डेंग्यू रोखण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे वातावरण दमट आहे. अंदमान ते लक्षद्विपपर्यंत हा पट्टा निर्माण झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.