www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. पावसाचा जोर कायम असला तरी कोणत्याही भागात पाणी साचलं नसल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केलाय.
सकाळी ९.४५ 'शाळेतील मुलांना एकटं सोडू नका... मुलांना पालकांच्या ताब्यात देऊनच शाळा बंद करा' मनपा आयुक्तांनी दिला शाळांना इशारा
सकाळी ९.३० मुंबई महापालिकेच्या सकाळच्या शाळा पावसामुळे सोडण्याचा आदेश... दुपारनंतरच्या शाळा भरणार नाहीत, मनपानं केलं जाहीर...
सकाळी ९.१५ मुसळधार पाऊसामुळे ठाण्यातील शाळा बंद करण्याचा ठाणे महापालिकेचा निर्णय. महापालिकेने शाळा सोडल्या.
सकाळी ९.०० ठाणे- मुंब्रा बायपास रस्ता खचला... ऐरोली, कल्याण आणि शिळफाटाकडे जाणारी वाहतूक खोळंबली
सकाळी ७.३० मुंबई बरोबरच नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यातही पाऊस सुरूच आहे. सकाळी रेल्वे वाहतुकीवर फारसा परिणाम जाणवला नसला तरी सध्या पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू आहे. रेल्वे वाहतूक धिम्या गतीनं का होईना पण सुरू आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सकाळीच तारांबळ उडाली.
सकाळी ७.०० `मुंबईकरांनो गरज असली तरच घराबाहेर पडा` असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं.
दरम्यान, आज मुंबईत पुन्हा एकदा हायटाईडचा इशारा देण्यात आलाय... दुपारी १ वाजून २७ मिनिटांनी समुद्रात ४.९५ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आलाय. तसंच मुंबईकरांनी समुद्रावर जाणं टाळावं, असं आवाहन करण्यात आलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.