www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबईकरांसाठी तशी खुशखबर आहे. मात्र ही न्यूज खरंच खुशखबर ठरते का यासाठी मुंबईकरांनो तुम्हाला उद्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण सोमवारपासून मुंबईकरांना मुंबईतल्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही. हे आम्ही नाही म्हणत... तर असा दावा पालिकेनं केला होता.
गणेशोत्सावपूर्वी मुंबईतले रस्ते बुजवण्यात येतील असा दावा पालिकेनं केला होता. महापौर सुनिल प्रभू यांनी स्वत: स्पष्ट केलं होतं की २५ ऑगस्टपर्यंत मुंबईतल्या रस्त्यांवरचे सर्व रस्ते बुजवण्यात येईल. याच आश्वासनाची मुदत आज संपतेय. त्यामुळं पालिकेच्या दाव्यांनुसार उद्यापासून तुम्हाला कदाचित मुंबईतल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं दर्शन होणार नाही.
दरम्यान, या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीनिवासन आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली होती.
त्यामुळं उद्यापासून एखादा खड्डा तुम्हाला दिसल्यास त्याचे फोटो काढा... त्याची माहिती झी मीडियाला द्या.. मुंबईतल्या खड्ड्यांची दृष्यं दाखवून आम्ही पालिकेच्या दाव्यांची पोलखोल केली होती... मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाबाबत आवाज उचलला होता...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.