www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच नाव घेऊन एका बडतर्फ पोलीस हवालदाराने एका संस्थेतील लोकांना साडेपाच लाख रुपयांचा गंडा घातला. दहिसर पोलिसांनी याप्रकरणी मिलिंद साळवी या हवालदाराच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.
भारतीय अन्न महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची `रिटायर्ड एम्प्लॉईज फेडरेशन असोसिएशन` नावाची एक संस्था आहे. ही संस्था सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळवून देते. या संस्थेतील लोकांना मिलिंद साळवीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन मिळवून देतो असे सांगून पैसे घेतले.
ऑक्टोबर 2013 मध्ये संस्थेचे अध्यक्ष नारायण हाटे यांची मिलिंद साळवींशी भेट झाली. यावेळी साळवीने आपण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जवळचे असल्याचे सांगितले. या कामासाठी 10 लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. साळवीवर विश्वास ठेऊन हाटे आणि त्यांचे दोन सहकारी शंकर बच्चे आणि रामनाथ तनपुरे यांनी साळवीला पाच लाख ४० हजार रुपये दिले. पण नंतर मात्र आपली फसवणूक केल्याचे त्यांना समजले.
या प्रकाराणात पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी लक्ष घातल्यानंतर दहीसर पोलीस उपायुक्तांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.