मुंबई : सध्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या आवाजातील कथित क्लिप महाराष्ट्राच्या राजकारणात घुमते आणि व्हायरल होत आहे. पण ही क्लीप खरी असेल तर ती फोडली कोणी पंकजा मुंडेंच्या घरचा भेदी कोण हा प्रश्न स्वतः पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना पडला आहे.
भगवानगडाच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना भाषण करू द्यायला नामदेवशास्त्रींनी विरोध केलाय. तर आपण गडावर जाणारच, असा आक्रमक पवित्रा पंकजा मुंडेंनी घेतलाय.
त्यानंतर नामदेवशास्त्री यांना धमकी देणारी ऑडिओ क्लीप आज सायंकाळी महाराष्ट्रातील प्रत्येक फोनमध्ये आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली.
ही ऑडिओ क्लीप कोणी रेकॉर्ड केली...
ही ऑडिओ क्लीप जर खरी असेल तर घरका भेदी कोण हा प्रश्न सध्या सगळ्यांना सतावत असेल...
काय झालं असेल त्या ठिकाणी...
१) पंकजा मुंडेनी भगवान गडावर दसऱ्या संदर्भात पंचक्रोशीतील विश्वासू कार्यकर्ते आणि सरपंच यांना बोलवले असे ( ऑडीओ क्लीपमध्ये तसे संदर्भ आहे)
२) त्यावेळी एखाद्या घरच्या भेदी पंकजा मुंडे यांच्या जवळचे स्थान पटकावले असेल....
३) पंकजा मुंडे यांचा आवाज कथित ऑडिओ क्लीप स्पष्ट ऐकू येतो. त्यामुळे तो भेदी खूप जवळच बसला असेल.
४) त्याने कोणाच्या नकळत ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू ठेवले असे.
५) मग काय विरोधकांना हे रेकॉर्डिंग दिले असेल आणि ताईंचे रणनिती उघडी पाडली असण्याची शक्यता या ठिकाणी उपस्थित होत आहे...
आता ही जर ऑडिओ क्लिप खरी असेल आणि तो घरचा भेदी कोण हे ताईंना आता लक्षात आले असेल... नाही तर त्यांनी शोध घ्यावा...