पोलिसांविषयी तुमचे अनुभव लिहा आणि म्हणा #Sudhara

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या गृहखात्याचा कारभार आहे. मात्र या खात्याच्या बाबतीत सर्वात जास्त तक्रारी आहेत. तेव्हा राज्यातील पोलीस खातं समाधानकारक काम करत नाहीय, आणि सामान्य नागरिकांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतोय हे उघड आहे.

Updated: Aug 23, 2016, 10:50 AM IST
पोलिसांविषयी तुमचे अनुभव लिहा आणि म्हणा #Sudhara title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या गृहखात्याचा कारभार आहे. मात्र या खात्याच्या बाबतीत सर्वात जास्त तक्रारी आहेत. तेव्हा राज्यातील पोलीस खातं समाधानकारक काम करत नाहीय, आणि सामान्य नागरिकांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतोय हे उघड आहे.

पोलीसांमध्ये माणुसकी आहे, पण माणुसकी जपणाऱ्या पोलिसांची संख्या फारकमी आहे. अशा पोलिसांना आमचा सलाम.

मात्र पोलीस खात्यात असे अनेक धेंड आहेत, जे सामान्य माणसाचा आवाज तर दाबूनच टाकतात, पण तक्रार दाखल न करून घेता, दांडगाई करत त्यांना घरी पाठवतात.

सत्यता असूनही तक्रार दाखल करून न घेणे, पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पैसे मागणे, चौकशी अधिकारी असून समोरच्या आरोपीला जास्तीत जास्त सूट देणे, कोर्टासमोर कमीत कमी पुरावे दाखल करणे असे प्रकार पोलिस खात्यात सर्रास वाढले आहेत.

बिल्डरांच्या तर दावणीला काही पोलीस बांधल्यासारखे आहेत. बिल्डरांच्या पैशांच्या जोरावर ते कायद्याचा धाक दाखवून अनेकांना फुकट दर्डावतात, खोट्या केसेस दाखल करण्यास मदत करतात. पोलीस स्टेशन ही आपली वाडवडिलांची जायदात असल्यासारखं ओरडतात.( हा प्रकार काही पीआय मंडळी सर्रास करताना दिसते.) अशाच लोकांना आपल्याला सुधरा हा मेसेज द्यायचा आहे.

यासाठी तुम्ही तुमचा पोलिसांविषयीचा अनुभव या बातमीखाली फेसबुकवर लिहा आणि पुढे लिहा #Sudhara @MumbaiPolice
(पोलिसांविषयी चांगले अनुभव असतील तर ते देखील आवर्जुन लिहा, पोलीस दलातील निष्ठावान पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरेल.)