चंद्रपूर जिह्यात संकट, कोरपना हादरला

आर्थिक दुर्बल घटकांसाठी डझनभर योजना आणि त्याची जोरदार प्रसिद्धी करूनही कुपोषणाची समस्या जैसे थेच असल्याचं दिससंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना या अतिदुर्गम भागात कुपोषणाच्या समस्येने आरोग्य विभाग हादरलाय. आतापर्यंत ७ बालकांना कुपोषणाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 21, 2013, 11:20 AM IST

ww.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
आर्थिक दुर्बल घटकांसाठी डझनभर योजना आणि त्याची जोरदार प्रसिद्धी करूनही कुपोषणाची समस्या जैसे थेच असल्याचं दिससंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना या अतिदुर्गम भागात कुपोषणाच्या समस्येने आरोग्य विभाग हादरलाय. आतापर्यंत ७ बालकांना कुपोषणाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातले राजुरा, कोरपना आणि जिवती ही तालुके म्हणजे नक्षलग्रस्त भाग. टेकड्या आणि वनाच्छादीत असलेला हा भाग विकासापासून वंचित आहे. सततचा पाऊस असलेल्या या भागात रोजगाराची समस्या पाचवीला पुजलेली आहे. त्यातच आता कुपोषणाची भर पडलीय.
कोरपना तालुक्यातल्या शिवापूर आणि मांगलहिरा गावातल्या ७ बालकांना कुपोषणाच्या उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. सर्व बालकांचं वय ७ ते १५ महिने एवढं आहे. तालुक्यातल्या अनेक गावांत रस्ते नाहीत. आरोग्ययंत्रणा तर फारच वाईट अवस्थेत आहे. अंगणवाड्या कुषोषण रोखण्यात महत्त्वाचं योगदान देतात. पण त्याबाबत पालकांमध्ये माहितीची कमतरता दिसून येत आहे. त्यातच आर्थिक विपन्नावस्थाही कुपोषणाला कारणीभूत ठरत आहे.
कोरपना हे तालुक्याचं गाव असूनही याठिकाणी आवश्यक असलेलं तालुका वैद्यकीय अधिका-याचं कार्यालय दूर आहे. आरोग्य अधिका-यांची पदं रिक्त आहेत. कुपोषणाची समस्या या भागात वाढत आहे. या समस्येकडे सरकारने तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ