CM पदावरून राष्ट्रवादीला चव्हाणांचा टोला

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये CM पदावरून वाकयुद्ध सुरु झाले आहे. माणिकराव ठाकरेंनंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीला टोला हाणला, आधी निवडणुका होऊ द्या, मग बोला. कोणी मुख्यमंत्री व्हायचे ते मतदानानंतर ठरवू.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 5, 2013, 05:00 PM IST

www.24taas.com ,शिर्डी
राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये CM पदावरून वाकयुद्ध सुरु झाले आहे. माणिकराव ठाकरेंनंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीला टोला हाणला, आधी निवडणुका होऊ द्या, मग बोला. कोणी मुख्यमंत्री व्हायचे ते मतदानानंतर ठरवू.
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी कामाला लागा असे कार्यकर्त्यांना आदेश दिलेत. त्यावरून काँग्रेसने राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्यास सुरूवात केलीय. प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला. जास्त जागा निवडून आणा आणि मग बोला, असा सल्ला राष्ट्रवादीला दिला.
माणिकराव यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी राष्ट्रवादीला पुन्हा चिमटा काढलाय. राज्यात आघाडीचे सरकार आहे. आघाडीचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे. मुख्यमंत्री कुणी व्हायचे यासाठी आधी मतदान तर होऊ द्या, असे चव्हाण म्हणालेत.

शिर्डी येथे साईंचे सपत्नीक दर्शन घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांनी शाब्दीक जोरदार चिमटा काढला. चव्हाण म्हणाले, राज्यात काँग्रेस पक्ष आणि सरकार दोघांचेही काम चांगले आहे. मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असून, सर्व पक्षांनी एकत्र येऊन तालुकास्तरावर काम करण्याची गरज आहे. मी राजकारणापासून कधीच बाजूला नव्हतो. पुढील काळातही पक्ष सोपवील ती जबाबदारी पार पाडू, असे सूचक विधान चव्हाण यांनी केली.
मराठवाड्यातील सिंचनप्रकल्पांना पुरेसा निधी मिळाला नाही. निधी कमी असताना जास्त कामे सुरू केली. त्यांची किंमत वाढली ही वस्तुस्थिती आहे, असे चव्हाण म्हणाले. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला मुख्यमंत्री पद देऊन चूक झाली, असे विधान केले होते. याविधानाचा चव्हाण यांनी समाचार घेतला.