www.24taas.com, इम्फू
सुल्तान अझलन शाह हॉकी टुर्नामेंटमध्ये सलग दोन पराभवानंतर भारतीय टीमनं जोरदार कमबॅक केलं. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान टीमला भारतानं रंगतदार मुकाबल्यामध्ये पराभूत केलं. पहिल्या दहा मिनिटातच दोन्ही टीम्सकडून एकूण तीन गोल झाले.
पाकिस्ताननं पहिल्यांदा गोलचं खात उघडलं. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. सहाव्या मिनिटाला भारताकडून रुपिंदर पाल सिंगनं पहिला गोल झळकावत भारताला 1-1 नं बरोबरी साधून दिली. त्यानंतर नवव्या मिनिटाला युवा आकाशदीपनं गोल करत भारताची आघाडी 2-1 नं वाढवली.
पहिल्या हाफमध्ये 2-1 नं आघाडी भारतीय टीमनं आघाडी घेतली. त्यानंतर सेकंड हाफमध्ये भारतानं आपली आघाडी आणखी वाढवत 3-1 नं विजय मिळवला. तिसरा गोल मनदीप सिंगनं 56 व्या मिनिटाला केला. टुर्नामेंटमध्ये आपलं आव्हान कायम राखण्यासाठी भारतासाठी ही मॅच महत्त्वाची होती. आता भारताचा पुढचा मुकाबला यजमान मलेशिया आणि न्यूझीलंडशी होणार आहे.