www.24taas.com, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई
`हॉकी इंडिया` हा भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी खेळाची संघटना आहे. या संघटनेकडे फारसा पैसा नसतानाही देशावर कोसळलेल्या संकटाची जाणीव ठेवत या त्यांनी उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. तर दुसरीकडे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने मात्र कोणतीही मदत जाहीर केलेली नाही.
खरतर हॉकी इंडियाकडे खेळाडूंना मानधन देण्याइतपतही पैसे नसतात तरीही देशावरील या राष्ट्रीय संकटाची जाणीव ठेवत त्यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. तर दुसरीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेल्या टीममधील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी एक कोटींच बक्षीस तातडीने जाहीर करणा-या कोट्यधीश बीसीसीआयकडे मात्र दानत नसल्याचचं समोर आलय.
भारतावर सध्या राष्ट्रीय संकट कोसळलय. उत्तराखंड या राज्यात पूराने थैमान घातल असून त्याने अद्यापपर्यंत हजारो नागरिकांचा बळी घेतलाय. तर कित्येक नागरिक अजूनही पूराच्या पाण्यात अडकलेले आहेत. त्यांच्या मदतीसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी खेळाची संघटना `हॉकी इंडिया`नेही या राष्ट्रीय संकटाची जाणीव ठेवत पूरग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय.
राष्ट्रीय क्रीडा संघटना या नात्याने आम्ही आमची जबाबदारी समजून ही मदत केली असून हे आमच कर्तव्य असल्याचं संघटनेच्या अधिका-यांकडून सांगण्यात आल. मात्र, याचवेळी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या आणि वार्षिक 868 कोटी रुपयांची कमाई करणा-या बीसीसीआयकडे दानत नसल्याचं प्रामुख्याने दिसून आल.
धनाढ्य बीसीसीआयने मात्र अद्यापपर्यंत कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. विशेष म्हणजे आत्ताच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेल्या टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला बीसीसाआयने प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस तातडीने जाहीर केल. पण, उत्तराखंडमध्ये ही दुर्घटना घडून पंधरा दिवस उलटून गेले तरी कोट्यधीश बीसीसीआय कवडीचीही मदत जाहीर करत नाहीय.
यामुळेच आता बीसीसीआयवर टीका केली जात आहे. शिखर धवनने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळालेल्या प्लेअर ऑफ टूर्नामेंटचे बक्षीस पूरग्रस्ताना मदत म्हणून जाहीर केल. तर पुराचा फटका बसलेल्या हरभजन सिंगने 10 लाखांची मदत जाहीर केलीय.
मात्र हे अपवाद वगळता कोट्यवधी क्रिकेटपटूंनीही अद्यापपर्यंत काहीही मदत केलेली नाही. खरतर हॉकी इंडिया ही संघटना श्रीमंत नाही आणि खेळाडूंनाही मानधन देण्यासाठी त्यांना काटकसरच करावी लागते मात्र तरीही राष्ट्रीय संकटाची जाणीव ठेवत त्यांनी लाखांची मदत केली. तर कोट्यवधींची कमाई असलेल्या बीसीसीआयने कवडीचीही मदत केली नसल्याने बीसीसीआयकडे दानतच नाही असच म्हणाव लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.